July 23, 2024
Home » किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून, रांजणगाव येथील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव शेपु येथील सासू- साडू वाद मिटवायला गेलेल्या दुसऱ्या साडूचा मारहाणीत खून झाला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दि २३ जून रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मुक्तार शेख मुमताज वय ४० चांदणी चौक जोगेश्वरी, ता गंगापूर जि छत्रपती संभाजीनगर असे मृत साडूचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख मुमताज शेख इसाक यांना चार मुले आहेत त्यापैकी तिघांचे लग्न झाले असून मोठा मुलगा मुक्तार याची सासरवाडी रांजणगाव शेपु येथील आहे. दि २० जून रोजी मुक्तार यांची सासू राहिदाबी ह्या मुक्ताच्या घरी गेल्या होत्या, काही वेळणानंतर सासूने मुक्तारला रांजणगाव दत्तनगर फाटा येथे सोडायला सांगितले सोडा कारण मुक्तार यांचा साडू मुस्ताक हा त्याची पत्नी व मला खूप त्रास देतो रात्री अपरात्री दारु पिवून घरात गोंधळ घालतो त्यामुळे आम्ही खुप परेशान झालो आहोत तुम्ही त्यांना समजावून सांगा असे सासूने सांगितल्यानंतर मुक्तार यांनी सासूला सोडायला सायंकाळी रांजणगाव येथे गेले. रात्री साडू मुश्ताक व त्याचा मेहूणा शेख सलीम शेख सत्तार यांच्यात वाद झाले त्यानंतर मुक्तार यास त्याची पत्नी व त्याची मेहुणी तनुखान, त्याचा मेहुणा सलीम शेख सत्तार व साडू शेख मुश्ताक यांनी त्यास घाटी दवाखाना येथे दाखल केले असता दि २३ जून रोजी मुक्तार शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून वडील शेख मुमताज यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

——

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!