July 26, 2024
Home » रचलेल्या कटामधून एकजन फुटला अन् अपहरणाचा कट फसला, उद्योजक कंक अपहरण कट प्रकरणी 6 जन अटकेत

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर :  वाळूज एमआयडीसीतील यशश्री प्रेस कोम्स प्रा. लि. चे संचालक हेमंत मधुकर कंक (वय ६४) यांचे अपहरण करून १२ कोटी रुपयांची खंडणी मागायची व रक्कम मिळाल्यानंतर त्यांना संपवायचे असा कट रचण्यात आला होता. शहर पोलिसांनी सतर्कता दाखवत, अवघी यंत्रणा कामाला लावून कट रचणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. आर्थिक विवंचनेतून आपण हा कट आखल्याचे त्यांनी सांगितले. सहाही जणांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.जी. गुणारी यांच्या न्यायालयात हजर केले असता २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  किरण सखाराम कोल्हे (वय २३, रा. गुरुपिंपरी ता. घनसावंगी जि. जालना), ऋषीकेश विष्णू हुड (वय १९, रा. पाडळी ता. पैठण), आकाश भाऊसाहेब पाचरणे (वय २२, रा. भोयगाव ता. गंगापूर), रोहित दत्तात्रय ढवळे (वय २१, रा. हिंगणीबेरडी ता. दौंड जि. पुणे), आदेश जनार्दन गायकवाड (वय १९, रा. शिवूर बंगला ता. वैजापूर) आणि कार्तिक सचिन पवार (१९, रा. कोरडगाव ता. वैजापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यातील पहिल्या तीन आरोपींना १९ जूनला आणि उर्वरित तीन आरोपींना आज, २१ (जून) पहाटे अटक करण्यात आली. कंपनीत काम करून चहाची टपरी टाकलेल्या दोन तरुणांनी एकत्र येऊन कंपनी मालकाचेच अपहरण करण्याचा हा कट आखला होता. मात्र, सात जणांच्या गँगमध्ये वाद झाला आणि ही बातमी फुटली. या गँगमधील एकाने पोलिसांच्या कारवाईमुळे घाबरून व बक्षिसाच्या आशेने ही माहिती थेट उद्योजकाला सांगितली. त्यामुळे हा कट उघड झाला. उद्योजक कंक यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी या कटाची कबुली दिली आहे. कटामागे आणखी कोण्या महत्त्वाच्या व्यक्तीचा हात तर नाही किंवा गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यासाठीच आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील उद्धव वाघ यांनी न्यायालयाकडे केली होती. 

असा समोर आला कट…

किरण कोल्हे याची वाळूजमध्ये चहाची टपरी आहे. दुसरा आरोपी ऋषी हूड याची गुळाच्या चहाची टपरी आहे. याच टपरीवर आकाश पाचरणे काम करतो. अपहरणासाठी त्यांनी पुणे, जालन्यातून इतर तरुणांना बोलावले. त्यानंतर ४ हजारांत मोंढा नाका येथील दुकानातून छऱ्यांचे पिस्तूल खरेदी केले होते, असे तपासात समोर आले आहे. किरण याच्यावर उद्योजक कंक यांच्या हालचालीवर लक्ष देण्याची जबाबदारी होती. त्यावरून किरण आणि ऋषी हूड यांच्यात वाद झाले. त्यामुळे किरणसोबत असलेला आकाश हा गँगमधून बाहेर पडला. आपण ही बातमी अगोदरच उद्योजक कंक यांना कळवली तर आपल्याला बक्षीस मिळेल, असे त्याला वाटले. त्याचबरोबर अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांच्या कारवाईची त्याला भीती वाटली. त्यामुळे त्याने कंक यांची भेट घेऊन कटाची माहिती दिली

कंक यांना दिली कटाची माहिती…

कंक यांच्या कंपनीचे वाळूज भागात चार प्लांट आहेत. २४ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास ते रोपळेकर रुग्णालयाजवळील पोळी भाजी केंद्रासमोर आपल्या कारमध्ये बसत असताना त्यांच्याकडे एक भयभीत झालेला युवक आला. त्याने तुम्ही कंक साहेब आहेत ना, तुम्ही यशश्री कंपनीचे संचालक आहेत ना, अशी विचारणा केली. त्यावर कंक यांनी होकार दिला. त्यांनी आकाशला नाव, गाव विचारले असता त्याने काही उत्तर दिले नाही. चार-पाच दिवसांपासून तुमच्यावर पाळत ठेवत आहेत. तुमचे अपहरण करण्याचा त्यांचा कट असून तुमच्या जिवाला धोका आहे, असे सांगितले. या कटात किरण कोल्हे आणि रोहित ढवळे हे असल्याचीही माहिती त्याने कंक यांना दिली. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास महावीर चौकाजवळ पुन्हा त्याने मिलिंद कंक यांची भेट घेतली व साहेब, जिवाची काळजी घ्या, एवढे सांगून तो तेथून निघून गेला. अपहरणाच्या कटामुळे कंक यांना धक्का बसला. त्यांनी कंपनीचे संचालक धनंजय पवार यांना घडलेला प्रकार सांगितला. माहिती देणाऱ्याचे वर्णन सांगितल्यावर तो आकाश असल्याचा संशय आला. त्यानंतर दोघांनी त्याचा शोध सुरू केला. त्या वेळी त्याचे नाव आकाश पाचरणे असून, तो एमआयडीसी वाळूज परिसरात राहत आल्याचे समोर आले. संपूर्ण कटाचा आराखडा कागदावर रेखाटला… आकाश अवघ्या १९ वर्षांचा असून आईबरोबर भांडण झाल्यानंतर तो काम शोधण्यासाठी शहरात आला होता. किरण कोल्हे हा त्याचा ओळखीचा होता. धनंजय पवार यांनी पाचरणेचा मोबाइल क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. पवार यांनी त्या परिसरात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. महाराणा प्रताप चौकाजवळ किरण कोल्हे याचे सागर आमृततुल्य हॉटेल असल्याचे समजले. किरणचा मित्र असलेल्या ऋषी हूड याच्या टपरीवर आकाश काम करीत होता. त्यांनी किरणच्या चहा टपरीवर काम करणाऱ्या एका मुलास पाचरणेचा फोटो दाखवून चौकशी केली मात्र, त्याने ओळखत नसल्याचे सांगितले. त्याच मुलाने कंक यांच्या कारचा फोटो काढून आकाश पाचरणे याच्या मोबाइलवर पाठवला. ही बाब तपासादरम्यान समोर आली. या प्रकरणात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उद्योजक मिलिंद कंक यांच्या अपहरणाचा कट रचणारा एक आरोपी ऋषी हूड हा पूर्वी कंक यांच्याच कंपनीत काम करीत होता. त्याला कंक यांच्याविषयी पूर्ण माहिती होती. त्याने आरोपी आकाश पाचरणे याला कंक यांच्या कंपनीत नेले होते, ही बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. पोलिसांना कटाचा सुगावा लागल्यानंतर वरील तिघा आरोपींच्या अनुक्रमे दौंड, पुणे आणि वैजापूर येथून मुसक्या आवळल्या. कोठडीदरम्यान त्यांनी साथीदार रोहित ढवळे, आदेश गायकवाड आणि कार्तिक पवार यांच्या साथीने कट रचल्याचे कबूल केले. उद्योजक कंक यांचे अपहरण करून १२ कोटींची खंडणी मागून त्यांना जिवे ठार मारण्याचा कट रचला होता. विशेष म्हणजे रचण्यात आलेला कटाचा संपूर्ण आराखडा हा एका कागदावर मांडण्यात आला होता, अशी कबुलीदेखील आरोपींनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कृष्णा शिंदे

——-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!