July 26, 2024
Home » निर्दयी आईचे धक्कादायक कृत्य; आईचा संमतीने करत होता १४ वर्षाच्या मुलीवर शारीरिक संबंध, मुलगी ८ महिन्याची गरोदर, रांजनगाव शेणपुंजी येथील धक्कादायक प्रकार 

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर येथील रांजनगाव शेणपुंजी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून जन्म दात्या आईनेच आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध करण्यास भाग पडल्याने १४ वर्षीय मुलगी ८ महिन्याची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला  या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आईच्या प्रियकरासह निर्दयी आईला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १५ जून रोजी घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे १४ वर्षीय मुलीला त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले होते, त्यानुसार घाटी दवाखण्यातून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे येथे माहिती देण्यात आली त्यानीसार दिनांक १६ जून रोजी पिडीत मुलीचा घाटी हॉस्पिटल येथे जबाब नोंदवला असता तिने मागील आठ महिण्या पुर्वी रांजनगांव शे.पु. येथील एका शाळेतून घरी जात असतांना दुपारी एक वाजताच्या सुमारास रांजनगांव शे.पु. येथील रूम मध्ये अनोळखी इसमाने बळजबरीने शारिरीक संबंध केले असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. हा अतिशय गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने कृष्णा शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तपासाचे चक्रे फिरवून  गुन्हयातील पिडीत मुलीची आई व वडील यांच्याकडे उलट तपास केला. सहायक पोलिस निरीक्षक श्रध्दा वायदंडे यांनी पिडीत मुलीची आई व पिडीत मुलीस वेगवेगळे करून त्यांच्याकडे विचारपुस केली.मुलीची आई व  आईची प्रियकर हे पिडीत मुलीच्या समोर सिंगल रूममध्ये शारिरीक संबंध करत होते.तसेच पिडीत मुलीच्या आईनेच तिच्या अल्पवयीन 14 वर्षाच्या मुली सोबत तिचे प्रियकरास शारिरीस संबंध करण्यास संमती दिली. त्यामुळे अल्पवयीन मुलगी ही गरोदर राहिल्याचे झाले तपासात निष्पण झाले आहे. त्यावरून पिडीत मुलीची आई वय ३७  वर्ष व तिचा प्रियकर आरोपी अंकुश प्रल्हाद जाधव,वय  39 वर्ष रा. रांजनगांव शे.पु. ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांना दि 17 जून  रोजी राञी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलिस करीत आहे.

——

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!