July 18, 2024
Home » वाळूज महानगरात ठिकठिकाणी काचऱ्याच्या ढीगांमुळे परिसरात दुर्गंधी; प्रशासनाचे दुर्लक्ष

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज वाळूज महानगरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असून परिसरातील नागरिक मोठे आंदोलन छेडण्याचा तयारीत आहे. वाळूज महानगरमधील वडगाव- तिसगाव रस्ता हा पुढे औद्योगिक वाहसातील जोडला जातो, रत्यावरून छत्रपती संभाजीनगर शहरातून कारखान्यातील कामगारांसह अधिकारीही प्रवास करतात परंतु त्यांना रत्यालगत साचलेल्या या कचराच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने हा ठिकठिकाणी पाणी साचले असून याच रत्यावर उघड्यावर मास विकले जाते ती उरलेली घाण कुठेतरी रात्याच्या बाजूला टाकली जाते ही दुर्गांधी लांब पर्यंत जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून सिडको प्रशासनाने तत्काळ दाखल न घेतल्यास हाच कचरा सिडको कार्यालयासमोर नेऊन टाकणार असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

जाळला जातो कचरा; धुरामुळे त्रास
सिडकोच्या संबंधित ठेकेदाराकडून हा कचरा उचल्याऐवजी जाळल्या जात असल्याने परिसरातील वयस्कर व लहान मुलांना त्याचा नेहमी त्रास होत आहे. याकडे सिडको अधिकारी दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे नागरिकांचा संताप वाढत आहे.

——

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!