July 18, 2024
Home » गाय अंगावर धावली; चिडलेल्या तरुणाकडून गाय चारणाऱ्या तरुणाचा खून

Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एकलहेरा गावात धक्कादायक प्रकार घडला आहे, गाय अंगावर धावली म्हणून चिडलेल्या तरुणाने गायीसह गाय चारणाऱ्या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाणी केली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असतांना दि ९ जून रोजी मृत्यू झाल्याची घटना आहे. ओंकार उत्तम जाधव वय १९, रा एकलहेरा जि छत्रपती संभाजीनगर असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ७ जून रोजी सायंकाळी शुभम शेतीमध्ये गायीला पाणी पाजण्यासाठी घेऊन जातांना रात्यामध्ये उभा असलेल्या विरू पवार या तरुणाच्या अंगावर गाय धाऊन गेली, यामुळे वीरूला राग आला व बाजूला पडलेल्या लाकडी दांड्याने गायीला मारहाण करायला सुरुवात केली, ओंकारने त्याची समजूत घाल्याचा प्रयत्न केला मात्र चिडलेल्या विरुने ओंकारला लाकडी दांड्याने मारहाण सुरुवात केली. त्यामुळे ओंकारणे चुलत भाऊ शुभम ला आवाज दिला व शुभम ने मित्राला बोलून ओंकारला बजाजनगरच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले, परंतु बेशुद्ध अवस्थेत असलेल्या ओंकारवर औषधोपचार करता येणार नसल्याचे सांगितले व बेशुद्ध ओंकारला घाटी दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू असतांना दि ९ जून रोजी ओंकारचा मृत्यू झाला आरोपी विरू पवारला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पथरकर हे करीत आहे.

———

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!