July 19, 2024
Home » महिलेच्या गळ्यातील गंठन हिसकावले, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : पंढरपूर येथून बजाजनगर येथे येण्यासाठी रिक्षाची वाट बघत असतांना तिरंगा चौकामध्ये तोंडाला रुमाल बांधलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन बळजबरीने हिसकावले. ही घटना दि १ जून रोजी दुपार अडीच वाजेच्या सुमारास घडली. सुमित्रा दशरथ लांडगे वय ४८ रा. आर एक्स ४/११ जागृत हनुमान जवळ बजाजनगर, संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि १ जून रोजी दुपारच्या सुमारास पंढरपूर येथे कपडे खरेदी करण्यासाठी सुमित्रा लांडगे ह्या मंदाकिनी लाड, पुष्पलता शहाणे, मंगल काशिद या महिला सोबत रिक्षाने गेल्या. खरेदी करुन बजाजनगरकडे जाण्यासाठी तिरंगा चौक येथे येताच, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका काळ्या रंगाची आलेला वय अंदाजे ३०-३५ काळ्या रंगाचा हाफ शर्ट घटलेला व तोंडाला रुमाल बांधलेला चोरटा समोरून येऊन बळजबरीने सुमित्रा लांडगे यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन हिसकावले. त्यामुळे त्या झटापटीमध्ये गंठनाचा काही भाग सुमित्रा यांच्या हटतामध्ये राहिला व गंठनाचा ७.५० ग्रॅमचा पट्टा चोरटा घेऊन पसार झाला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!