July 22, 2024
Home » ट्रक चालकाला लुटणारे ५ दरोडेखोरांना वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून अटक; १५ लाख ७२ हजाराचा मुद्देमाला जप्त

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत एएस कल्ब चौकाजवळ ट्रक व क्लिनरला लुटून ट्रक लंपास करणाऱ्या ५ दरोडेखोर अटक करुन व एका विधीसंघर्ष बालकाला पोलिसांनी दि २९ मे रोजी ताब्यात घेऊन त्यांचेकडून १५ लाख ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दि २८ मे रोजी ट्रक चालक योगेश काकडे यांच्या फिर्यादीवरून मारहाण करुन बळजबरीने पैसे हिसकून ट्रक पळून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, पोलीस आरोपींचा शोध घेत असतांना शुभम बाबासाहेब मोर वय २० वर्ष रा तिसगाव, शंतनू बबनराव जगताप वय १८ वर्ष, रा गोळवाडी, यज्ञेश संतोष गवळी वय २२ रा म्हाडा कॉलनी तिसगाव, स्वामी लालचंद सालामुरे वय २१ रा गोळवाडी, तुषार सूरज तुर्की वय २० रा म्हाडा कॉलनी तिसगाव व एक विधीसंघर्ष बालक यांना ताब्यात घेऊन पोलिसांना विचारूस केली असता वरील आरोपींनी गुन्हाची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण १५ लाख ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्ह्यातील वापरलेली कार व दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे असून मा. नयालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, जयंत राजूरकर, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, विवेक जाधव, पोलीस अमलदार जालींदर वाखुरे, सुरेश भिसे, नितीन इनामे, जाधव, हनुमान ठोके, यशवंत गोबडे, गणेश सागरे, समाधान पाटील, विठ्ठल शिंगाडे, जालिंधर रंधे, विजय पाटील, राजाभाऊ कोल्हे बाळासाहेब आंधळे, प्रविण नितनावरे यांनी केली असून पुढील तपास सपोनी. मनोज शिंदे हे करीत आहे

———————

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!