July 23, 2024
Home » संभाजीनगरमधील वाडगावातही बाप-लेकाला उडवले, प्रकृती चिंताजनक

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील ढोरकीन लोहगाव रोडवरील मुलानी वाडगाव फाट्यावर भरधाव कारने बाप लेकाला जोराची धडक देऊन जखमी केले.आज दि.२७ मे सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान हि घटना घडली.तारू पिंपळवाडी
गावाकडुन वलिम्याचा कार्यक्रम आटोपून छत्रपती संभाजीनगर कडे मोटारसायकलवर जातांना मुलानी वाडगाव फाट्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने जोराची धडक दिल्याने दुचाकीवर असलेले बापलेक गंभिर जखमी झाले आहेत.त्यांना तात्काळ नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.चारचाकी वाहण धडक देऊन पळ काढत असताना गाडीचे समोरील टायर फुटल्याने गाडी जाग्यावरच थांबली.ती कार तालुक्यातील भाजपच्या एका बड्या नेत्याची असल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे स.पो.नि.गिते व हे.कॉ.सोमनाथ तांगडे यांनी पंचनामा केला.घडलेल्या घटनेचा रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होऊ शकला नाही.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!