July 23, 2024
Home » ट्रक चालकाला लुटले, सहा दरोडेखोरांवर गुन्हा दाखल, १६ लाखांचा मुद्देमाल लंपास; एएस क्लब चौक जवळील घटना…

Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर – नगर महामार्गावरील एएस क्लब जवळील चोरडिया पेट्रोल पंप समोर रात्री दरोडा टाकून एका ट्रक चालक व क्लिनरला मारहाण करुन ट्रकसह एकूण १५ लाख ९२ हजार रुपयेचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला ही घटना रात्री दि २८ रोजी १:३० वाजेच्या दरम्यान घडली असून ६ दरोडेखोरांवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश अशोक काकडे वय २८ रा आळंद ता फुलब्री जि छत्रपती संभाजीनगर यांच्या मालकीची ट्रक एमएच ४१ ए यू ३८०९ आहे. योगेश आणि क्लिनर लक्ष्मण खमाट यांनी दि २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता वाबोरी जि अहमदनगर येथून ४०० बॅग खत व २० हजार रुपये अॅडवांन्स म्हणून घेतले. दि २८ मे रोजी रात्री १:३० वाजेदरम्यान संभाजीनगर – अहमदनगर रस्त्यावरील एएस क्लब जवळील चोरडिया पेट्रोल पंप जवळ येताच समोरून कार एमएच ०२ सीएल निळ्या रंगाची आडवी लावली त्यातून तीन जण उतरले त्यामुळे ट्रॅक चालकाने ट्रक रत्याच्या कडेला घेतली असता व पाठीमागून दुचाकी एमएच २८ बीइ ६०४८ यावर तीनजन आले ट्रक चालक व क्लिनरला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरू केली, व खिशातील २० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले, दोघांनी आरडा ओरड केली परंतु रात्रीची वेळ असल्याने कुणी मदतीस आले नाही, दरोडे खोरांमधून दोघांनी ट्रकची नुकसान केली. व ड्रायव्हर क्लिनर यांनी कसाबसा जीव वाचवत पळ काढला. दरम्यान दरोडेखोरांनी ट्रकही तेथून लंपास केला. याप्रकरणी १३ लाख रु. किमतीचा ट्रक, २ लाख ७२ हजार रुकिमतीचा खताच्या बॅग, व रोख २० हजार रु. असा एकूण १५ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला असून या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे हे करीत असून दरोडेखोरांचा तपास घेत आहे.

———

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!