July 26, 2024
Home » विजेचा शॉक लागून व्यक्तीचा मृत्यू; संतप्त नातेवाईक मृतदेहासह पोलिस ठाण्यात, कारवाईची मागणी

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-

पैठण : पैठण येथील एमआयडीसी परिसरातील जैनस्पिनर फाट्यावर (रविवार) रोजी महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अबूबकर हरुण शेख रा. आदर्श नगर मुद्दलवाडी ता. पैठण यांच्या पाचशेहून अधिक नातेवाईकांनी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या विषयी अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री सात ते आठ वाजण्याच्या सुमारास पैठण एमआयडीसीतील जैनस्पिनर फाट्यावर मालवाहतूक करणारा गगनगिरी ट्रान्सपोर्टचा ट्रक चालकाने उभा केला होता. यावेळी ट्रकच्या वरच्या बाजूस महावितरण विभागाची विद्युत पुरवठा करणारी खंडित झालेल्या तारेचा स्पर्श झालेला होता. परंतु चालक काहीतरी वस्तू आणण्यासाठी ट्रक उभा करून बाहेर गेला होता. याच दरम्यान ट्रक जवळ उभा असलेल्या अबूबकर हरुण शेख (वय ३२) रा आदर्शनगर मुद्दलवाडी ता. पैठण हा ट्रकला हात लावून उभा असताना अचानक महावितरण विभागाची खंडित झालेला वीज पुरवठा सुरू झाला. यामध्ये अबूबकर हरुण शेख याचा विद्युत धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्यामुळे आज (सोमवार) दि. २७ रोजी सकाळी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अबूबकर हरुण शेख याचा मृतदेह थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणून संबंधित महावितरण विभागाचे कर्मचारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकारची माहिती मिळताच पैठण उपविभाग पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे, जमादार करतारासिंग सिंगल, गणेश, खंडागळे, राजेश चव्हाण, मंचरे, दांडगे यांनी नातेवाईकांशी चर्चा करून त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र पोलिस स्टेशनबाहेर नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण बनले आहे

———

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!