July 22, 2024
Home » घाणेगावातील बंद घरात कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटली; पण गूढ कायम …

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : घाणेगाव येघील संघर्षणगरमध्ये एका बंद पत्राच्या घरामध्ये कुजलेला मृतदेह आढळला होता, त्या मृतदेहाची ओळख पाठवण्यात पोलिसांना यश आले असून ही आत्महत्या की हत्या याचे गूढ कायमव आहे.
घाणेगावमधील संघर्षनगर येथे दि २५ मे रोजी सायंकाळी पोलिसांना माहिती दिली की, एका पत्राच्या घरामध्ये दुर्गांधी येत असून दरवाजा आतून बंद आहे. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, ज्योती गात, आमलदार रोहित चिंधळे, पोना. कडू, आदिनी घटनास्थळी धाव घेतली कुजलेला मृतदेह नागरिकांच्या मदतीने घाटी दवाखान्यात पाठवला. परंतु घटस्थळी पोलीस उपनिरीक्षक यांना एक मोबाईल आढळला होता, त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता तो मृतदेह परमेश्वर इंद्रजीत शेलार, वय 23 वर्ष, या तरूणचा असून त्यांचे मूळ गाव स्वराज्य नगर बार्शी रोड लातूर आहे. तो वाळूज एमआयडीसी मधील विभूती कंपनी, गट नंबर 46 प्लॉट नंबर 86, घाणेगाव येथे मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता. परंतु तो तिथे का गेला? एवढे दिवस कुणाला का कळले नाही? त्याची हत्या झाली की त्याने गळफास घेतली ही याचा शोध पोलीस घेत आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

——-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!