July 23, 2024
Home » हत्या की आत्महत्या; घाणेगाव येथे बंद घरात आढळला कुजलेला मृतदेह

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर: घाणेगावातील संघर्ष नगर झोपडपट्टी येथे एका बंद घरात शनिवार (दि.२५) रात्री ८ वाजेच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने व घरमालक महिलाही गायब असल्याने मयताची ओळख कशी पटवावी असा प्रश्न पोलीसांना पडला असून हा की आत्महत्या या विषयी गुढ कायम आहे. घाणेगावच्या संघर्षनगरात मंगलबाई मारुती पाईकराव यांच्या बंद घरातुन प्रचंड दुर्गंधी येत असल्याने या वसाहतीतील नागरिकांनी या घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलीसांना दिली होती. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे, महिला उपनिरीक्षक ज्योती गात, पोना. कडु, पोकॉ.राोहित चिंधाळे, प्रशांत सोनवणे आदींनी घटनास्थळ गाठुन पोलीस पाटील शाम फाळके व सरपंच केशव गायके यांच्या उपस्थितीत या बंद घराचे दार उघडून आत प्रवेश केला असता पोलीसांना घरात एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. हा मृतदेह कुजलेला असल्याने तसेच प्रचंड दुर्गंधी पसरलेली असल्याने पोलीसांनी मास्क लावुन नागरिकांच्या मदतीने त्या अनोळखी इसमाचा मृतदेह शव-विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घरात पोलीसांना एक मोबाईल मिळून आला असून मात्र मोबाईलला लॉक लावलेले असल्याने तो मोबाईल पोलीसांना उघडता आला नाही.
घातपात की आत्महत्या गुढ कायम
या वसाहतीतील नागरिकांनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार हे घर मंगलबाई पाईकराव यांचे असून त्या आठवडाभरापासून घरी नसल्याची माहिती पोलीसांना दिली. घरमालक महिला गायब असून तसेच अनोळखी मयत इसमाची ओळख पटविण्याचा कुठलाही पुरावा घटनास्थळी मिळून न आल्याने या प्रकरणांचा गुंता चांगलाच वाढला आहे. मयत अनोळखी इसमाने आत्महत्या केली की, हा घातपाताचा प्रकार आहे, या विषयी गुढ कायम आहे. या घटनेची एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

——

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!