July 23, 2024
Home » बंद घर फोडून कपाटातील सव्वा तीन लाखाचे दागिने लांबविले संशयित सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर: सिडकोमध्ये चोरट्यांनी बंद घर फोडून ३ लाख ३६ हजार रुपये किमंतीचे दागिने लांबविल्याची घटना शुक्रवार दि.२४ मे रोजी उघडकीस आली आहे. संशयित दुचाकीस्वार दोन भामटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उर्मिला भाउसाहेब साठे अहमदनगर जिल्ह्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षीका म्हणून नोकरीस असून त्या सिडको वाळूजमहानगरातील राज स्वप्नपुर्ती हाैसिंग सोसायटीत पती भाऊसाहेब साठे, दोन मुली यांच्यासह वास्तव्यास आहेत. मुलगी महाविद्यालयातुन घरी आली असता तिला घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तुटलेला दिसून आला. यानंतर घरात प्रवेश केला असता तिला घरातील साहित्य अस्त-व्यस्त पडलेले दिसून आले. हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच वडील भाऊसाहेब साठे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधुन त्यांना या घटनेची माहिती दिली.
घरातील कपाटात उर्मिला साठे यांनी ठेवलेला अडीच तोळे वजनाचा व १ लाख ६० हजार रुपये किमंतीचा सोन्याचा राणीहार, अडीच तोळे वजनाचे व १ लाख २३ हजार रुपये किमंतीचे सोन्याचे गंठण, ४ ग्रॅम वजनाचे व २६ हजार २०० रुपये किमंतीचे सोन्याचे झुमके, ४ ग्रॅम वजनाचे व २६ हजार ९०० रुपये किमंतीचे सोन्याचे टॉप्स आदी एकुण ३ लाख ३६ हजार १६० रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसून आले. घरातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याने शिक्षिका उर्मिला साठे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठुन तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

———

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!