July 23, 2024
Home » अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार; करोडी शिवरातील घटना

Screenshot

Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : सोलापूर धुळे महामार्गावरील करोडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून ही घटना दि २३ मे रोजी रात्री घडली. प्रकाश गुलाबराव मोरे वय २८ रा कन्नड जि संभाजीनगर असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेले माहितीनुसार प्रकाश हा मत्स्य व्यावसायिक असून तो दि २३ मे रोजी दुपारी छावणी येथील बाजारामध्ये मच्छी विकण्यासाठी आला. सायंकाळी मच्छी विकून धुळे सोलापूर महामार्गने दुचाकीने कन्नड येथे घरी जात असतांना अचानक अपघात झाला. या अपघातात प्रकाश हा गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत पडलेल्या प्रकाशाला रामचंद्र वैद्य व मनोज वेहधणे या नागरिकांनी घडी दवाखान्या दाखल केले. उपचार सुरू असतांना सकाळी ९:१५ वाजता प्रकाश मोरे यांचा मृत्यू झाला. नेमका हा अपघात कसा आणि कशामुळे झाला हे कळू शकले नाही. अज्ञात वाहनाच्या धडकेने हा अपघात झाल्याचा नागरिकांचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!