July 23, 2024
Home » लग्न करुन देत नाही म्हणून मुलांनीच बापाला संपवल; वडगाव कोल्हाटी येथील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर – लग्न करुन देत नाही शेतीही वाटून देत नाही त्यामुळे पोटच्या दोन मुलांनी बापाच्या पोटात साफासफ वार केले. उपचार सुरू असतांना दि २३ मे रोजी रात्री त्या निर्दोष बापाचा मृत्यू झाला. संपत लक्ष्मण वाहुळ वय ४८ रा वडगाव कोल्हाटी असे त्यांचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपत वाहुळ हे वडगाव कोल्हाटी येथील रहिवासी असून त्यांना पोपट वाहुळ (२८) व प्रकाश वाहुळ (२६) हे दोन मुले आहे, वाहुळ यांच्या नावावर शेती आहे तर दोन मुले खाजगी कंपनीत काम करतात दि ८ मे रोजी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास संपत वाहुळ हे एकटे घरी होते. लहान मुलगा प्रकाश हा कंपनीतून घरी येताच वडिलाला शिवीगाळ करू लागला, वडिलाने विरोध केला असता त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली मोठा मुलगा पोपटतही त्यावेळी घरी आला असता त्यानेही मारहाण करण्यास सुरुवात केली, दोघेही मारहाण का करताय विचारले असता आमचे लग्न करुन देत नाही आणि शेतीही वाटून देत नाही असे म्हणत मोठ्या मुलाने साफासफ चाकूचे वार केले, दोन्ही मुले बापावर तुटून पडले बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, आरडा ओरड झाल्याने संपत वाहुळ यांचे भाऊ रामनाथ वाहुल, संजय वाहुळ, आकाश व संदीप वाहुळ हे मदतीस धाऊन आले, त्यावेळी हा आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी दिली. संपत वाहुळ यांना घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही मुलांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचार सुरू असतांना दि २३ मे रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तापास पोलीस करत आहे.

———

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!