July 19, 2024
Home » चरित्रावर संशय घेत पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून; रांजणगाव येथील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : रांजणगांव शेणपूजी येथील कृष्णा नगर येथे २५ वर्षीय पत्नीचा पतीनेच गळा आवळून खून केल्याची घटना आज दि. २३ आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. ज्योती सुभाष राऊत वय २५ असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष राऊत हा पत्नीसोबत कृष्णा नगर रांजणगाव येथे रहातो, एका महिन्यापूर्वी नासेर शेख यांच्या रुममध्ये सुभाष आणि ज्योती भाड्याने राहण्यासाठी आले. सुभाष हा गवंडी काम करतो तर त्यांना दोन मुले आहे मुलगी ७ वर्ष तर मुलगा ५ वर्षाचा आहे. दोन्ही मुले शिक्षणासाठी ज्योतीच्या आईकडेच आहे. सुभाष हा वारंवार पत्नीच्या चरित्रावरसंशय घेत होता. दरम्यान रात्री सुभाष ने साडीच्या काठाणे पत्नीचा गळा आवळून खून करुन बाहेरुन दरवाजाची कडी लाऊन पसार झाला. आज दि २३ मे रोजी सकाळी बाहेरून बंद असलेला दरवाजा उघडला असता मध्ये ज्योती ही काहीही हालचाल करत नसल्याने शेजारील रहिवाश्यांनी रूम मालक नासेर शेख यांनी सांगितले, त्यांनी पोलिसांना माहिती दिली, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, संदीप शिंदे, पोलीस आमलदार रोहित चिंधडे, प्रशांत सोनवणे, अनिल भूषेवाड यांचासह यांचासह श्वान पथक, ठशे तज्ञ यांनी धाव घेत पाहणी केली. एका एका पलंगावर झोपलेल्या अवस्थेत साडीच्या सहायाने गळा आवळलेला असल्याचे निदर्शनात आलेले आहे. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या ज्योतीला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.याप्रकरणी ज्योती राऊतचे मामा हरिदास उबाळे यांच्या फिर्यादीवरुन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा सुभाष राऊत यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तापास पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले हे करीत आहे.

————

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!