न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : वाळूज पोलीस ठाणे येथे चार महिन्यापूर्वी गर्भपात व गर्भलिंग चाचणी हा गुन्हा दाखल होता गुन्हातील महिला आरोपी चार महिन्यापासून फरार होती, पोलिसांनी अटक करुन तपासात गोळ्या पुरवणारे दोन आरोपींना वाळूज पोलिसांनी आज दि १७ मे रोजी अटक करुन कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गर्भलिंग चाचणी व गर्भपात यासंदर्भात वाळूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. गुन्ह्यातील आरोपी महिला वैशाली रविंद्र जाधव रा बकवालनगर चार माजिन्यापासून फरार होती, पोलिसांनी महिला आरोपी जाधव हिस दि १५ मे रोजी अटक करुन विचारपूस केली असता गर्भपात करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या आरोपी सुनील लाहुराव मेघारे वय ३५, रा धरमपुर व डॉ गणेश सोनाजी सावंडकर रा गट नंबर १२ महादेव मंदिराजवळ वडगाव कोल्हाटी जि संभाजीनगर यांना यांनी पुरवल्या असल्याचे उघड झाले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ९३ गर्भपात गोळ्याच्या किट जप्त करण्यात आल्या आहे. ही कारवाई गर्भपात करणारे व गर्भलींग निदान करणारे तीन आरोपीतांना केले जेरबंद वाळूज पोलीसांची मोठी कारवाई पोलस आयुक्त मा. मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त मा. नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त मा. महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक मा.राजेद्र सहाणे, पोलीस निरीक्षक मा. जंयत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे, औषध निरीक्षक अंजली मिटकर, पोना/सतिष हंबर्डे, पो.अं. सुखदेव कोल्हे, विजय पिंपळे, श्रीकांत सपकाळ, नितीन धुळे, यांनी पार पाडली आहे.
——