July 18, 2024
Home » फोटोग्राफरवर जीवेघना हल्ला; बजाजनगर येथील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : इंस्टाग्रामवर रील बनवण्यासाठी एकोणावीस वर्षीय तरुणी व तिच्या मैत्रिणीला शिर्डीला फिरायला नेले. म्हणून तिचा प्रियकर मित्रासह चौघांनी त्यांची कार अडवून चाकू, कट्यार, दगड व हाताचापटाने बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी दि १४ रोजी रात्री ८:४० वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दि १४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास फोटोग्राफर बद्रीनाथ सखाराम रायकर (वय २८), चेतक रामसिंग उसारे (वय १९) मच्छिंद्र जनार्धन मोगल (वय ३२) हे मारोती कार (एम एच २०, जीके -२०१३) मधून बजाजनगर येथील ओळखीच्या दोन मुली व तिचा भाऊ असे शिर्डीला गेले होते. तेथून परत आल्यानंतर मुलींना त्यांच्या सोसायटी समोर सोडत असताना रात्री ८:४० वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर चार तरुण आले. त्यांनी बद्रीनाथ रायकर याच्या गाडीच्या समोर गाडया आडव्या लावून रस्ता आडवला. व काही एक न विचारता कटर व ब्लेड, दगड, हाताचापटाने मारहान केली. यावेळी दगडाने डोक्यात व कट्यारीने पाठीत वार केल्याने रायकर हा गंभीर जखमी झाला. त्यामध्ये ३० ते ३५ टाके पडले. तसेच चाकूचे वार केल्याने सोबतचा चेतक रामसिंग उसारे याच्या डाव्या हाताला जखम झाल्याने चार टाके पडले. तसेच मच्छिंद्र जनार्धन मोगल यास हाता चापटाने मारहान केली. परंतू तो घाबरून गाडीतून उडी मारून पळून गेला. त्याचप्रमाणे गाडीच्या काचा दगडाने फोडून नुकसान केले. या प्रकरणी बद्रीनाथ सखाराम रायकर याच्या फिर्यादीवरून आरोपी सुमीत सुभाष रुपेकर, आरफाज शेख व त्याच्या सोबतचे दोन अशा चार जणांनी विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम ३०७, ३२४, ३२३, ४२७, ३३७, ३४१ भादंवि. सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे हे करत आहेत.

——-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!