July 18, 2024
Home » मराठा आरक्षण मिळत नाही दुसरीकडे डोक्यावर कर्ज; चिठ्ठी लिहून अजून एका मराठा तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; वडगाव कोल्हाटी येथील घटना.

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव कोल्हाटी येथे सालामपुरे नगर येथील एका मराठा तरुणाने कर्जबारीला व मराठा आरक्षण मिळत नसल्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना दि १५ मे रोजी सकाळी उघडकीस आली.

दत्ता कालिदास महिपाल वय अंदाजे २२ शिक्षण १२ वी असे मयत तरुणाचे नाव असून तो मूळ शिंदेवाडी ता. माजलगाव जिल्हा बिड येथील असून आई वडील शेतकरी आहे. मिळालेल्या माहितीनुसार दत्ता महिपाल हा ५ महिन्यापूर्वी वडगाव येथील सलामपुरे भाड्याने एका रूममध्ये राहत होता. त्याचा सोबत त्याचा सहकारी कृष्णा पवार हे दोघेही खाजगी कंपनीमध्ये काम करत होते, सहकारी रात्र पाळीला गेले होता तर दत्ता हा रात्री घरीच होता, दत्ता ने लिहलेल्या चिठ्ठामध्ये बँकेकडून घेतलेले कर्ज भरता न आल्याने बँकेकडून वारंवार फोन येत आहे व दुसरीकडे मराठा आरक्षण मिळत नाही त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा मचकूर लिहून रात्री भाऊ महेश महिपाल याला व्हॉट्सअप केला. परंतु महेश ने तो मेसेज सकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान बघितले. आणि तात्काळ वडगाव कोल्हाटी येथे राहत असलेले नातेवाईक अशोक सुरवसे यांना फोन करुन दत्ताच्या रुमवर जायला सांगितले. अशोक सुरवसे यांनी दरवाजा उघडा असलेल्या रुममध्ये जाऊन दत्ताने गळफास घेतल्याचे बघितले व महेश व रूम मालक यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमएडीआय पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, ज्योती गत यांच्यासह रोहित चिंधले, विजय पाटील, पंकज साळवे, मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह घाटी दवाखान्यात पाठवला.

चिठ्ठीत लिहलेला मचकूर
भाऊ मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझी आठवण येत आहे. परंतु काही कारणास्तव गोपाळा अर्बन माजलगाव या बँकेतून मी १ लाख रुपये कर्ज घेतले होते, परंतु काही हप्ते थकल्यामुळे बँकेतून रोज फोन येत आहे, त्यामुळे मला खूप त्रास होत आहे मोठे उद्योजक घेतात व ते कर्ज न भरता पळून जातात, विजय माल्या, नीरव मोदी यांच्यावर काही कारवाई होत नाही, परंतु शेतकऱ्यांवर कारवाई केली जाते, तसेच दुसरे कारण मराठा आरक्षण भेटणं नाही मी केलेल्या उपोषणाचा काय फायदा झाला नाही. सरकारने भरपाई करावी. मामी-पप्पा मला माफ करा, असा मचकूर त्या चिठ्ठीत लिहला आहे.

… तर वाचला असता दत्ताचा जीव
दत्ता ने रात्री चिठ्ठी लिहून भाऊ महेशला पाठवली, उशीर झाल्याने महेशला तो मेसेज बघता आला नाही, रोजच्या प्रमाणे महेश ने मेसेज बघताच धक्का बसला. तो मेसेज महेशने रात्री बघितला असता तर दत्ताचा जीव वाचवता आला असता.त्यामुळे त्याची खंत महेशने व्यक्त केली आहे.

————-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!