July 23, 2024
Home » पत्नीने डोक्यात वरवंटा मारून पातीचा खून; जोगेश्वरी येथील घटना…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील जोगेश्वरी येथे झालेल्या घरघुती वादातून पती-पत्नी व मुलाच्या भांडणात पतीचा खून झाला असून ही घटना दि ९ मे रोजी घडली असून आज दि १२ रोजी सकाळी उचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पत्नी व मुलाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्रभाकर पुंजाजी त्रिभुवन वय ६५ रा जोगेश्वरी असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. दि ९ मे रोजी रात्री पती प्रभाकर पत्नी अनिता व मुलगा दिलीप यांच्या घरघुती वाद झाला या वादामध्ये पत्नी अनिताने पती प्रभाकर यांच्या डोक्यात लाकडी पाठ व वरवंठा मारला, त्यात ते गंभीर जखमी झाले, आरडा ओरड झाल्याने शेजारी राहणारे प्रभाकर यांचे पुतणे बबन त्रिभुवन आले त्यांनी जखमी प्रभाकर यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला परंतु पत्नीने त्यालाही विरोध केला. दिनांक १० मे रोजी इतर नातेवाईकांच्या मदतीने त्यांना घाटी दवाखान्यात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी मुलगा दिलीप त्रिभुवन व मयताची पत्नी अनिता त्रिभुवन यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्याला आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!