July 26, 2024
Home » महिलेची मृत्यूशी झुंज; चुकीचा उपचार झाल्याचा नातेवाईकाचा आरोप, डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर मधील रांजणगाव शेणपुंजी येथील संजय निमोने यांची मुलगी भरती सोनवणे ह्या पोट दुखते म्हणून राजनगाव येथील साळुंके हॉस्पिटल येथे उपचारासाठी गेल्या असात त्यांच्यावर चुकीचे उपचार झाल्यामुळे त्यांची तब्येत अचानक खालावली व त्यांना दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले असून भारती सोनवणे यांची मृत्यूशी झुंज सुरु असून साळुंके हॉस्पिटलकडून चुकीचे उपचार झाले असल्याचे नातेवाईकाचे म्हणणे आहे, याप्रकरणी संजय निमोने यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिलेली आहे.

दिलेल्या अर्जामध्ये असे म्हटले आहे की, दिनांक ८ मे रोजी सायंकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास तांदळाचे दळण करत असताना भारती यांचे पोटात दुखू लागले. तिचे पती नामे विजय सोनवणे यांनी तिला उपचारासाठी रांजणगाव येथील डॉ. साळुंके पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी नेहमी रुग्णावर उपचार करणारे डॉ. साळुंके हे हजर नव्हते. यावेळी त्याठिकाणी स्वतःला डॉक्टर म्हणून घेत पठाण नावाचे व्यक्तीने मीच डॉक्टर आहे असे म्हणून उपचार करण्यास सुरुवात केली. कोणतीही चौकशी व तपासणी न करता माझी मुलगी भारती हिला भरती करून घेतले. सुरुवातीला एक इंजेक्शन दिले, त्यामुळे तिला संपूर्ण अंगात जळण होऊ लागली, तशी कल्पना तिने स्वतः पठाण यांना दिली. पठाण यांनी इंजेक्शनचे रिअॅक्शन आल्याचे सांगत पुन्हा एक सलाईन लावून त्यात इंजेक्शन सोडले, सलाईनद्वारे इंजेक्शन सोडल्याने जास्त त्रास होऊ लागल्याने भारती हिची शुद्ध हरपली. त्यामुळे पठाण यांनी यापुढे माझ्याकडून उपचार होऊ शकत नाही, असे म्हणत हात वर र केले. पुढील उपचारासाठी बेशुद्धावस्थेत भारती हिला बजाजनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेथील डॉक्टरांनी तपासून प्रथमोपचार सुरू केले. उपचार सुरू करताना डॉक्टरांनी मुलीची तब्येत खूप सिरीयस आहे, आमच्याकडे पुढील अद्ययावत सुविधा नसल्याने तिचा जीव वाचवायचा असल्यास शहरात हलवावे लागेल असे सांगितले त्यामुळे सगळे हादरून गेले. ताबडतोब अम्ब्युलन्स मागवून भारती हिला अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील रुग्णालयात दाखल केले आहे, सध्या ती व्हेंटिलेटरवर मरणाच्या दाढेत आहे. डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याचे सागून उपचार सुरू आहेत. असून, मरणासन्न आवस्थेत आहे. तिच्या या परिस्थितीला डॉ. साळुंके पाटील हॉस्पिटल मालक व बोगस डॉक्टर पठाण हेच जबाबदार आहेत असा आरोपी नातेवाईककडून करण्यात आला असून सदर डॉक्टर स्वतः हजर नसल्यास कोऱ्या लेटरहेडवर औषधी लिहून देतात व हजर असल्यास स्वतःच्या हॉस्पिटलच्या नावाचे लेटरहेडवर औषधी लिहून देतात, याविषयी रुग्णांनी विचारणा केल्यास सांगतात की, तात्पुरत्या स्वरुपात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतःच्या हॉस्पिटलच्या नावाचे लेटरहेड वापरतो व रुग्णाला अॅडमीट करून घेतल्यास कोऱ्या लेटरहेडचा वापर करतो असे सांगतात, यामागे त्यांचा काय उद्देश असू शकतो हे सौ. भारती सोनवणे प्रकरणावरून लक्षात येते असून, अशाप्रकारे कृत्य हे गुन्हा करून पळवाट काढण्यासाठी वापर करत असल्याचा दाट संशय येतो.असेही त्या अर्जात म्हणाले आहे.

भारती सोनवणे हिला 9 महिन्याचं एक बाळ असून, 9 वर्षाचा मुलगा व 7 वर्षाची मुलगी आहे. आज सदरील डॉक्टरने स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये बोगस व्यक्ती डॉक्टर म्हणून ठेवलेले असून, सर्रास रुग्णांवर उपचार करण्यात येतात, त्यामुळे परिसरातील गोर-गरीब जनतेच्या जिवाशी खेळ सुरू आहे, करिता आपणास नम्र विनंती करतो की, या डॉक्टरमुळे आज माझ्या मुलीवर ही परिस्थिती ओढावली असून, अजून कुणासोबत असे प्रकार घडू नये म्हणून सदरील डॉक्टरवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करून मला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे दिलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तापास पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले हे करीत आहे.

चुकीचे उपचार केलेले नाही – डॉ साळुंके

फिट हा आजार असल्याचे नातेवाईकाने सांगितले नाही त्यामुळे हा प्रकार घडला असून आमच्याकडे आयसीयूची सुविधा नसल्यामुळे पुढील उपचारासाठी आयसीयूची गरज होती त्यामुळे रुग्णाला उपचारासाठी पाठवले त्यामुळे कोणतेही चुकीचे उपचार झालेले नसल्याचे डॉ. साळुंके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!