July 26, 2024
Home » राष्ट्रसंत श्री तुकड़ोजी महाराज जयंती निमित भजन स्पर्धा उत्साहात संपन्न

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : राष्ट्रसंत श्री तुकड़ोजी महाराज यांच्या 115 वी जयंती निमित्त आयोजित भजन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. छत्रपती संभाजीनगरातील बजाजनगर येथील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर येथे रविवारी 5 में रोजी श्री गुरुदेव सेवा मंडळ व श्री गुरुदेव महिला मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे सलग दूसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले होते .

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती ही ग्रामजयंती म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे .यानिमित्त सकाळी सामुदायिक ध्यान करून रामधून (शोभायात्रा )काढण्यात आली. वाळूज पोलिस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक व भजन गायक सखाराम दिलवाले,श्री गुरुदेव सेवा मंडळ मराठवाडा सेवाधिकारी मनीष जैस्वाल, श्री गुरुदेव सेवा मंडळ संभाजीनगर जिल्हा सेवाधिकारी व श्री गुरुदेव सेवा मंडळ बजाजनगर चे अध्यक्ष अनिल अर्डक,उपाध्यक्ष संतोष निंबुळकर,जिल्हा परिषद सदस्य रेखाताई नांदुरकर,श्री गुरुदेव सेवा महिला मंडळाच्या अध्यक्ष रेखाताई हिंगणकर, यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने भजन स्पर्धे चा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी पांडुरंग सरोदे व वैशाली गवई व त्यांच्या सह कऱ्यानी खंजिरी भजन सादर केली.
भजन स्पर्धेत एकूण 12 पुरुष व महिला संघांनी भाग घेतला.या भजन मंडळांनी सुरेल स्वरात भजने,अभंग व गवळण सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कु.वैशाली लोळे व सुनील चोरे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.टी व्ही सेंटर हडको येथील श्री दत्त महिला भजनी मंडळ व बजाजनगरातील रूद्र भजन मंडळाला प्रथम क्रमांकाचे बक्षिस विभागून देण्यात आले.शिवशंकर कॉलनी संभांजीनगर येथील शिव हनुमान भजनी मंडळ हे व्दितीय क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले.तृतीय पारितोषिक मथुरा नगर सिडको एन 6 संभाजीनगर येथील अष्टविनायक महिला भजन मंडळाला देण्यात आले.अंबिका महिला भजन मंडळ शिवशंकर कॉलनी संभाजी नगर,आदर्श महिला भजन मंडळ सिडको वाळूज महानगर 1, माता येडेश्वरी भजन मंडळ पंढरपूर, व हर हर महादेव भजनी मंडळ बजाजनगर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.तसेच संत गोरोबाकाका भजनी मंडळ दौलताबाद चे भजन गायक शंकरराव जाधव यांना उद्योजक महेशकुमार धिमटे यांच्याकडून उत्कृष्ट गायकाचा पुरस्कार देण्यात आला. बजाज ऑटो सी. एस.आर. विभागाचे प्रमुख चंद्रप्रकाश त्रिपाठी यांच्या हस्ते सर्व विजयी संघाला बक्षिस वितरीत करण्यात आले.याप्रसंगी सौ.संतोष चंद्रप्रकाश त्रिपाठी, बजाज ऑटोचे अधिकारी श्री.भंडारी साहेब,श्री.शेख साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गजानन मानकर, दादुलाल बोरकर,राजू देशमुख,भानुदास पळसकर,राजाभाऊ ठाकरे,विलास मंगळे,ज्ञानेश्वर दरेकर,उत्तम वझळे, पांडुरंग मुटकरे,व्यंकटी टेकाडे,सुभाष बूले,बाळकृष्ण साबळे,बळवंत पांचाळ, नेमिनाथ खरबडे,केशवराव बुले,ज्ञानेश्वर धुर्वे, केशवराव सांभारे,संतोष भांडेकर,नरेश देशकर श्री. लव्हाळे ,वंदना मुटकरे,प्रतिभा दरेकर, सौ.वंदना बुले,सौ.वझळे सौ.भांडेकर यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!