July 26, 2024
Home » चोरलेल्या दुचाकीवरून मंगळसूत्र हिसकावणारे दोन चोरटे ८ तासात पोलिसांच्या ताब्यात

वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी परिसरातुन दुचाकी चोरल्यानंतर बजाजनगरातील एका महिलेचे मंगळसूत्र ओरबाडून फरार झालेल्या दोन चोरट्यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पकडले आहे या प्रकरणी तिघा भामट्यांना पोलीसांनी वाळूज परिसरात मुसक्या बांधत चोरलेली दुचाकी व मंगळसूत्र जप्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
वाळूज महानगरातील वडगाव – तिसगाव रत्यावर शिल्पा सुर्यवंशी व मिनाबाई सांबरुन (दोन्ही रा.बजाजनगर) मॉर्निंग वॉक करत असतांना कुंदन सोपान सपकाळे (२५, रा.वडगाव) यांनी सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपली दुचाकी (क्रमांक एम.एच.१९, क्यु.४१५४) घरासमोर हॅण्डल लॉक करुन उभी केली होती. आज मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कुंदन त्यांची दुचाकी गायब असल्याचे दिसून अली.तसेच वडगाव-तीसगाव रत्यावर शिल्पा सुर्यवंशी व मीनाबाई सांबरुन या मार्निंगवॉक करतांना रॉग साईडने लाल रंगाच्या दुचाकीवर बसून आलेल्या दोघा भामट्यांनी शिल्पा सूर्यवंशी यांचे गळ्यातील ६५ हजार रुपये किमंतीचे मंगळसूत्र हिसकावले. तसेच चोरी झालेल्या दुचाकी व मंगळसूत्र हिसकावणारे चोरट्यांकडे असलेली दुचाकीचे वर्णन मिळते जुळते असल्याने पोलिसांनी शोध सुरू केला.
सिडकोतील नायरा पेट्रोलपंपावर चोरलेल्या दुचाकीत पेट्रोल भरतांना दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले होते. साजापूर शिवारात शोध मोहिम घेत दुचाकी ३ वाजेच्या सुमारास पोलीसांनी सुमीत सुभाष रुपेकर (१९) दत्ता किसन सोनगिरे (१९, दोघेही रा.साजापूर) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले . या दोघांना पोलीस खाक्या दाखविताच त्यांनी वडगावातुन दुचाकी चोरल्याचे व फरार होतांना एका महिलेचे मंगळसूत्र हिस्कावल्याची कबुली दिली. दुचाकी व मंगळसूत्र चोरी केल्यानंतर सुमीत रुपेकर व दत्ता सोनगिरे यांनी दुचाकी करोडी शिवारात लपवून ठेवली होती. तर मंगळसूत्र सुमीत याचा मावसभाऊ विक्की बाळू सातदिवे (रा.देवगाव रंगारी) याच्याकडे दिल्याचे सांगितले. यानंतर पोलीसांनी विक्की सातदिवे यास ताब्यातुन घेऊन त्याजवळील मंगळसूत्र जप्त केले आहे. ही कामगिरी निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, पोकॉ. सुरेश भिसे, नितीन इनामे, योगेश शेळके, समाधान पाटील, हनुमान ठोके, यशवंत गोबाडे, सुरेश कचे, बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे आदींनी यशस्वीपणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!