July 18, 2024
Home » खाकीतील देवदूतांनी वाचवला एकाचा जीव; वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : पती-पत्नीच्या किरकोळ वादामुळे स्वतःचे जीवन संपवणाऱ्या व्यक्तीचे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी जीव वाचवला, गळ्याला लावलेला फास पोलिसांना काढल्यानंतर पतीच्या डोळ्यातील अश्रू थांबेन. ही घटना दि २ मे रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बजाजनगरमधील जयभवानी चौकमध्ये पती-पत्नी भाड्याने राहतात. त्यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले असून पत्नी खाजगी कंपनीमध्ये काम करते. सतत दारू पिऊन पती वाद घालत असल्याचे पत्नीने सांगितले. रात्री हातावर ब्लेड मारून घेत पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला, सकाळी परत दोघांमध्ये वाद झाला. पतीने अजून काही बरेवाईट करून घेऊ नये त्यासाठी पत्नीने बाहेर न जाण्याचा आग्रह केला. तरीही पती ऐकत नसल्याने पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठले, पोलिसांना माहिती दिली. पत्नी फोन उचलत नसल्याने पतीने व्हिडीओ कॉल केला असता पती छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत असल्याचे त्यात दिसले, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, आमलदार योगेश शेळके, चांदे, विनोद नितनवरे यांनी तात्काळ घायनस्थळी गेले. आतून दरवाजा बंद असल्याने योगेश शेळके यांनी दरवाजा तोडला, शिंदे यांनी दरवाजा तुटताच पतीच्या कमरेला पकडून वारती उचलले गळ्याला लावलेला फास काढून खाली उतरवले. पती पत्नीच्या झालेली वादाची कहाणी तो पोलिसांना सांगत होता. परंतु देवदूताप्रमाणे घटनास्थळी धाव घेत प्राण वाचवलेल्या पोलिसांचे सर्वत्र कौतक होत आहे. पोलीस ठाण्यात आणून पतीसह दोघांची समजूत घालण्यात अली. राग शांत झाल्यानंतर त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!