July 18, 2024
Home » वारंवार वीज खंडित; वैतागलेल्या लघुउद्योकाजकाचे वीज वितरण कार्यालयासमोर उपोषण; नुकसान भरपाईची मागणी…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे) –

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात अनेक लघुउद्योग आहेत, वडगाव गट नंबरसह मुख्य एमआयडीसीमधील लघुउद्योजकांचे अनेक अडचणी आहे त्यात वीजबिल नियमित भरून सुद्धा नियमित वीज मिळत नाही. त्यामुळे महिन्याला लाखोंचे नुकसान होते, त्यामुळे आज दि २७ एप्रिल रोजी सकाळी लघुउद्योजक सुनील भारते यांनी महावितरण कार्यालय गाठून एकट्यानेच उपोषण सुरु केले.

सुनील भारते यांचे वाळूज अयोध्योगिक परिसरामध्ये एच सेक्टरमध्ये श्रीविला अग्रो इंजिनिअरिंग नावाने लघुयोद्योक आहे , त्यांच्याकडे सदरण १२- १५ कामगार आहे, दि २६ शुक्रवार पासून वीजपुरवठा खंडीत आहे, आज दि २७ रोजीही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने सुनील भारते यांनी महावितरण कार्यालय गाठले, परंतु कार्यालयात मिळालेल्या उडवाउडवीच्या उत्तराने त्यांनी तेथेच उपोषण सुरु केले. एकीकडे उत्पादन कमी आहे, त्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने वाळूज औद्योगिक परिसरातील उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरणाने आमची अडचण दूर न केल्यास उद्योजक मोठे करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!