July 26, 2024
Home » सिडकोमधून एटीएम ओढून नेत चोरट्यांचा डल्ला; लाखोंची रक्कम लंपास

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील जयमल्हार चौकामध्ये असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम चोरट्यांनी चारचाकी गाडीला बांधून ओढून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दिनांक २२ रोजी सकाळी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको वाळूज महानगरमधील जयमल्हार चौकामध्ये एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. बाजूलाच माणिक शिंदे यांचे ऑटोमोबाईलचे दुकान आहे, नियमितपणे शिंदे हे आपले दुकान उघडले परंतु बाजूला असलेले एटीएम त्यांना फोडलेले दिसले,

त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे, सहायक पोलीस निरिक्षाल मनोज शिंदे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काशिनाथ महांडूळे, पोलीस उपरीक्षक संदीप शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती हे कळू शकले नाही. यावेळी पोलीस अंमलदार बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, प्रशांत सोनवणे, शरद वेताळ, गोकुळ जोशी, गणेश सागरे, गोरखनाथ कडू, आत्माराम बोराडे, नितीन इनामे, लखन गुशिंगे, पोलीस अंमलदार राजाराम डाखोरे, पोलीस हवालदार व्ही पी निकम, मनगटे, रवी खरात,आदींची उपस्थिती होती.

आचारसंहितेची नाकाबंदी नावापुरतीच…

वाळूज औद्योगिक परिसरातील मल्हार चौक ते वडगाव रोड या रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन उचलून नेल्याची घटना घडली आहे सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे या आचारसंहितेत गैरप्रकार होऊ pनये म्हणून पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या वेळेला ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे या नाकाबंदीचा कडक बंदोबस्त असतानाही अज्ञात चोरट्याने एटीएम गायब केले आहे जर नाकाबंदी ही कडक स्वरूपात आहे तर एटीएम चोरून नेणारे नाकाबंदीच्या बंदोबस्तावरील पोलिसांना का सापडले नाही असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये चर्चिला जात आहे

पोलीस निरीक्षक शिंदे चोरट्यांना जरबंद करतील….

वाळुज एमाडीसि पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एटीएम लंपास करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करतील अशी अपेक्षा औद्योगिक परिसरातील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे कारण कृष्णचंद्र शिंदे यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार घेण्याअगोदर ते नागपूर शहरात कार्यरत होते औरंगाबाद शहरापेक्षा नागपूर शहरात गुन्हेगारी जास्त प्रमाणात आहे या परिसरात काम करायचा अनुभव असल्यामुळे कृष्णचंद्र शिंदे हे निश्चितपणाने एटीएम लंपास करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करतील अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!