July 23, 2024
Home » दारूच्या नशेत हर्सूल जेलमधील पोलिस अंमलदाराची हत्या; जेल परिसरातच आढळला मृतदेह

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृहतील पोलिसाचा खून झाल्याची घटना समोर आली. जेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. सिद्धार्थ बन्सीलाल जाधव (वय ४२, रा.जेल क्वार्टर) असे मृत पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून १० तासात आरोपी अनिल नितीन कसबे, वय २४ रा जटवाडा छत्रपती संभाजीनगर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून खून केल्याचे आरोपीने काबुल केले असून पुढील तपास पोलीस करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!