July 18, 2024
Home » चोरटे मालामाल, इकडे पोलिसांचे हाल; एटीएम मशीन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल; तब्बल येवढे होते त्यात पैसे…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील जय मल्हार चौकामध्ये आज दि २२ रोजी चोरट्यांनी एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन उखडून लंपास केले, छत्रपती संभाजीनगर सहायक आयुक्तासह, शहर गुन्हे शाखा, वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

सदरील एटीएममशिनची देखभाल- दुरुस्ती सीएमएस इन्फोटेक लि. या कंपनीकडे आहे, या कंपनीचे व्यवस्थापक कैलास चांदोबा कांबळे, यांच्या फिर्यादिवकरून वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार या एटीएम मशिनमध्ये तब्बल ७ लाख ४६ हजार १०० रुपये येवढी रक्कम असल्याचे व्यवस्थापक कांबळे यांनी सांगितले आहे. एटीएम मधे सुरक्षेसाठी लावलेल्या कॅमेरावर चोरट्यांनी स्प्रे मारला असून चारचाकी वाहनाच्या साहाय्याने हे मशीन नेल्याचे एका कॅमेरात दिसत आहे. शहर गुन्हे शाखे पोलिस यांचासह, वाळूज एमआयडीसी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

पोलीस प्रशासन गुन्हे शाखेवर मेहरबान

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे सर्वत्र पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आलेले आहे मात्र राज्याचे पोलीस प्रशासन औरंगाबाद शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यावर मेहरबान असल्याचे दिसून येते कारण पोलीस आयुक्तालयात सहा वर्ष कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात मात्र सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकाला झालेला असतानाही पोलीस प्रशासनाने मात्र त्यांची इतरत्र बदली केलेली नाही त्यामुळे त्यांचे पोलीस प्रशासनात किती पोहोच आहे हे यावरून दिसून येते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!