July 21, 2024
Home » चोरी गेलेल्या चारचाकीसह चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी २४ तासात केली अटक

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातून दि १६ एप्रिल रोजी रात्री १:३० वाजेच्या दरम्यान, एका कमोनीसमोरून टाटा पिकअप एमएच २० डीइ ०९१९ उभी असतांना अज्ञात चोरांनी चोरी केली. अंकुश अशोकराव अघाव रा जोगेश्वरी ता गंगापूर जि छत्रपती संभाजीनगर याच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,

पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक प्रविण पाथरकर आणि सोबत DB स्टाफ ज्यात पो ह नितनवरे आणि पो शी गोबाडे यांना आरोपी शोधण्यासाठी रवाना केले. चोरी गेलेले वाहन हे मालेगाव जात असताना मध्येच वाखरी गावाजवळ स्थानिक पोलीस मदत घेवून वाहन चोरून नेणारा इसम दत्तात्रय मधुकर लोणारे वय 38 वर्ष, व्यवसाय मजुरी राहणार लोणारवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यास वाहन क्रमांक MH 20 DE 0919 सह जप्ती पंचनामा करून ताब्यात घेवून 24 तासात गुन्हा निष्पन्न केला.
सदर चोर हा कंपनी भागात चालक म्हणून काम शोधून काम मिळवतो रेकी करतो आणि नंतर संधी साधून वाहन चोरी करतो..

सदर कामगिरी पोलीस आयुक्त मा. मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त श्री. नितीन बगाटे , स पो आ/श्री महेन्द्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा शिंदे, पोलीस निरीक्षक श्री राजूरकर, स पो नि श्री मनोज शिंदे , पो उप नि/प्रविण पाथरकर, पो ह विनोद नितनवरे, धीरज काबलिये, पो शि/सुरेश कचें, सुरेश भिसे, यशवंत गोबाडे, नितीन इनामे, गणेश सगरे, हनुमान ठोके, समाधान पाटील, रवी गायकवाड, बाबासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे यांनी केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!