July 23, 2024
Home » भाजपाकडून आचारसहितेचा भंग; निवडणूक आयोगाकडे तक्रार

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे पर्व सुरू आहे. त्याकरता निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. मात्र निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेच्या नियमाचे वाळूजमहानगर परिसरात प्रशासनाकडून सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. कारण आचारसंहिता सुरू झाल्यानंतरही वाळुजमहानगर परिसरातील भिंतीवर भाजपचे निशाणी असलेले कमळ फुल दिमाखात नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे सध्या सत्ताधाऱ्यांची महायुती व विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया चे ज्येष्ठ नेते उमेदवारांच्या निवडीसाठी जोर बैठका घेत आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडाव्या याकरिता भारतीय निवडणूक आयोग कामाला लागले आहे.निवडणूक आयोगाने सर्वच पक्षाला आदर्श आचारसंहिताचे पालन करण्याचे आदेश दिले आहे.तसेच त्या संदर्भात काही नियम घालून दिले आहे. आचारसंहिता सुरू झाल्यापासून निवडणूक आयोगातर्फे सार्वजनिक ठिकाणी असलेले पक्षाचे फलक, नेत्यांनी केलेल्या कामाच्या उद्घाटनाचे फलक काढून टाकण्यात येत आहे,किंवा आच्छादन टाकून झाकले जात आहे. मात्र वाळुजमहानगरात मुख्य रस्त्यावरील राजकीय पक्षाच्या बॅनरबाजीवरच कारवाई करण्यात आली आहे.परंतु नागरी वसाहतीमध्ये थेट मतदारावर प्रभाव पाडणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या भिंतीवरील निशाणी चा मात्र अधिकाऱ्यांना विसर पडल्याचे दिसून येत असल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे.
जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मिळवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने मागील महिन्यात संपूर्ण देशात दिवार लेखन अभियान राबविले होते.या अभियानांतर्गत गावोगावी जाऊन भिंतीवर पक्षाचे निशाणी कमळ व “फिर एक बार, मोदी सरकार” या नाऱ्याचे लेखन केले होते. निवडणूक आचारसंहिता सुरू झाल्यानंतर संबंधित प्रशासनाने किंवा संबंधित पक्षाने भिंतीवरील लेखन मिटवणे आवश्यक होते.मात्र अद्याप पर्यंत वाळुज महानगरात अनेक सोसायटीच्या भिंतीवर कमळाचे फुल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.या कमळाच्या फुलाकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

आयोगाकडे तक्रार दाखल

वाळूजमहानगर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार मतदार संघाचे संभाव्य उमेदवार व उद्योग क्रांती उद्योजक संघटनेचे अध्यक्ष सुरेश फुलारे यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.विशेष म्हणजे या तक्रारीत त्यांनी पुरावा म्हणून भिंतीवर छापलेले कमळाचे फुल यांचे फोटो दाखल केले आहे. तसेच आयोगाने तात्काळ आदर्श आचारसंहितेचे पालन करावे.अन्यथा इतर उमेदवारांनाही तशा प्रचार करण्याची परवानगी देण्याची मागणी तक्रार अर्जामध्ये सुरेश फुलारे यांनी केले आहे.

……

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!