July 26, 2024
Home » व्हॉइस ऑफ मीडियाच्या संघटनेकडून वाळूज महानगरातील पत्रकारांना प्रत्येकी दहा लाखाचा आरोग्य विमा

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : – देश आणि विदेशामध्ये जवळपास 54 देशात कार्यरत असलेली पत्रकारांची व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेकडून छत्रपती संभाजीनगरसह वाळूज महानगरातील पत्रकारांना दहा लाखाचा आरोग्य विमा काढून रविवार( दि.24) रोजी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सतीश रेंगे, जिल्हा महासचिव अमित फुटाणे, संपादक शिवाजी बनकर, शहराध्यक्ष रवी माताडे, जिल्हा कोषाध्यक्ष संदीप चिखले, जिल्हा उपाध्यक्ष महेश डागा, राजेभाऊ मोगल, वाळूजमहानगर अध्यक्ष किशोर बोचरे, ज्येष्ठ पत्रकार शेख मेहमूद, आर के भराड, संतोष बारगळ, प्रकाश गाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश रेंगे, अमित फुटाणे, रवी माताडे, आदींनी व्हॉइस ऑफ मीडिया या देशव्यापी संघटनेचे ध्येयधोरण, लढा पत्रकारांचा पत्रकारांचे हक्कासाठी, आरोग्य,औद्योगिक, आदी क्षेत्रामध्ये व्हाईस ऑफ मीडियाचे सुरू असलेल्या कामाबद्दल प्रकाश टाकला. या प्रसंगी व्हाईस ऑफ मीडिया वाळुज शाखेचे संतोष बारगळ आर के भराड, संदीप चिखले, रवी गाडेकर, आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात आर के भराड, शेख मेहमूद, संतोष बारगळ,संदीप लोखंडे, संजय काळे, अशोक साठे,निलेश भारती, राहुल मुळे, रवी गाडेकर, अनिकेत घोडके, शिवाजी गायकवाड, हुरखान पठाण, विठ्ठल मस्के, रवी कुलकर्णी, रमेश हातोळे, भरत गायकवाड, आदींचा दहा लाखाच्या विमाचे वितरण करण्यात आले. संघटनेचे कार्य पाहून प्रेरीत झालेले पत्रकार माधव घोरबांड, संतोष बोटवे, राजू जंगले, डीपी वाघ, भरत थटवले, संदीप साळे, यानी व्हाईस ऑफ मिडीया संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले.

गरजवंत पत्रकारांना स्वतःच्या घरासाठी प्रयत्न करू – रेंगे

पत्रकार क्षेत्रात काम करत असतांना बऱ्याच पत्रकारांना कमी पगारावर काम करावे लागते त्यांना त्या पगारीमध्ये स्वतःचे घरे होऊ शकत नाही अशा गरजवंत पत्रकारांना स्वतःचे घर मिळवून देण्यासाठी सघटना भाविषात काम करेल असे मत जिखाध्यक्ष सतीश रेंगे यांनी व्यक्त केलं आहे.

पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल झाल्यास विमानुमल्य खटला चालवणार

पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करीत असताना कुठल्याही प्रकारच्या झालेल्या खोट्या तक्रारींची किंवा आपल्यावर झालेल्या गुन्ह्या संदर्भात कुठलाही खटला चालवण्यासाठी किरण ढेपे यांची पूर्ण टीम विनामूल्य खटला लढून मदत करुन पत्रकारांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे अॅड. किरण ढेपे यांनी संगितले.

विना क्लेम करण्यासाठी खास टीम

संघटनेकडून काढण्यात आलेल्या आरोग्य विमा बरोबर एक टीम तयार करण्यात आली आहे, एखाद्या पत्रकारचा अपघात झाल्यास विमा संदर्भात पूर्ण कागतपत्राचे काम सघटनेतील टीम करणार असल्याचे सघटनेकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!