July 18, 2024
Home » दोघांना अमानुष मारहाण करुन एकाचा खून, एक गंभीर; वडगाव कोल्हाटी येथील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साजापूर गोळीबार प्रकरण ताजे असतानाच वडगाव कोल्हाटीमध्ये मित्रामध्ये झालेल्या वादातून झालेल्या अमानुष मारहाणीत एकाचा खून तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना दि २३ रोजी घडली आहे. यात राजू मुरकुटे हा मयत झाला असून ज्ञानेश्वर देवरे हा गंभीर जखमी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू मुरकुटे आणि ज्ञानेश्वर देवरे हे सिडको वाळूज महानगरातील एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करतात. रात्री जेवण झाल्यानंतर हे मित्राला भेटण्यासाठी वडगाव कोल्हाटी येथील साई गार्डन हॉटेल गट नंबर ७० प्लॉट नंबर ५० वडगाव कोल्हाटी साजापुर रोड येथे आले. यात राजू मुरकुटे, ज्ञानेश्वर देवरे, ओम बुळे, सागर ढवळे व अन्य एकजण यांच्यात वाद झाला. या वादामध्ये राजू व ज्ञानेश्वर यांना वरील तिघांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीत राजू मयत झाला असून ज्ञानेश्वर हा गंभीर जखमी आहे. सकाळी ही घटना उघड होताच रात्याच्या कडेला ज्ञानेश्वर जखमी अवस्थेत नागरिकांना दिसला. पोलिसांनी तात्काळ जखमीला घटीमध्ये दाखल केले तर घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त महेद्र देशमुख, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, यांच्यासह योगेश शेळके, राजाभाऊ कोल्हे, बाबासाहेब आंधळे, यशवंत गोबाडे, विजय पाटील, तुकाराम पवार यांच्यासह आदिनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल असून एकाचा शोध पोलीस घेत आहे.

मयत राजू मूरकुटे

आठवड्याभरात दोन खून; नागरिकांमध्ये चिंता

आठवड्याभरामध्ये दोन खून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहे. परिसरात अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक नसल्याने मोठमोठे गुन्हे घडत आहे त्यामुळे अवैध धंद्यावर पोलिसांनी आवर घालावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!