July 26, 2024
Home » एका पोलिसाकडूनच नरोडेची हत्या; सजापूर गोळीबारातील खुनाचा गुन्हा उघड

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळुज मध्ये चार दिवसाच्या अगोदर व्यापाऱ्याचा खून झाला होता, त्याचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. धक्कादायक माहिती म्हणजे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून व्यापारी सचिन नरोडे यांना संपवले. ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड-कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांच्यासोबत नामदेव जगताप पोलिसांनी ताब्यात घेतले. मागील अनेक दिवसांपासून व्यापारी नरोडे यांच्या मागावर आरोपी पोलीस होता. रविवारी रात्री साजापूर परिसरातील वीज गुल होती, त्याच अंधाराचा फायदा घेत आरोपीने कपाळावर गोळी झाडून व्यापाऱ्याला संपवले. विशेष म्हणजे हा हेडकॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईत निलंबित होता, तर त्याच्यावर 354 प्रमाणे देखील गुन्हा दाखल आहे. पोलिसामधीलच हा गुंडा पोलिसांनी शोधल्याच्या घटनेची चर्चा सध्या संभाजीनगर मध्ये सुरू आहे.

तिच्या नादामुळे पोलिसानेच केला गेम …

तो तिच्या नादात असल्यामुळे पतीने काढला त्याचा काटा
सचिनचे अनैतिक संबंध असल्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली त्याला एक मुलगी सुद्धा आहे मात्र ज्या प्रेमामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली ते प्रेम त्याच्याजवळ असल्याने तिचा पती( रामेश्वर काळे ) नाराज होता तो पोलीस खात्यात निलंबित कर्मचारी होता आपली पत्नी दुसऱ्या बरोबर राहते याची सहल त्याच्या मनात असल्यामुळे त्याने अंधाराचा फायदा घेत सचिनच्या डोक्यात गोळ्या घातल्या आणि सचिन गतप्राण झाला

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!