July 23, 2024
Home » कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या; वडगाव कोल्हाटी येथील घटना…

वाळूज महानगर: वडगाव येथील साईनगर मधील विजय उत्तम मावस (४६) यांनी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर साडीच्या मदतीने गळफास घेतल्याची घटना मंगळवार ता.१९ रोजी सायंकाळी ५.४० वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. विजय मावस हे औद्योगीक परिसरातील खाजगी कंपनीत काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या बरोबरीने मुलगाही कंपनीत काम करत होता. घटनेच्या दिवशी मुलगा कंपनीत गेला होता तर, पत्नी रूग्णालयातय गेली होती. मावस यांनी दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जावून गळफास घेत आत्महात्या केली.

रूग्णालयातून परत आलेल्या पत्नीला पती दिसत नसल्याने त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील खोलीत बघितले असता त्यांना आत्महात्येचा प्रकार लक्षात आला. पत्नी, मुलीने टाहो फोडताच शेजारील नागरीकांनी धाव घेतली. स्थानीक पोलिसांनी बेशुद्धावस्थेतील मावस यांना खाली उतरवत घाटी रूग्णालयात रवाना केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या घटनेची एमआयडीसी वाळूज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!