July 18, 2024
Home » दुचाकीची उभ्या कारला धडक; तरुण गंभीर जखमी, प्रकृती चिंताजनक

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : एमआयडीसीने औद्योगिक परिसरामध्ये अपघात रोखण्यासाठी गतिरोधक टाकले, परंतु काहीवर पांढरे पट्टेच मारले नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बजाजनगरमध्ये तरुणाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने त्याची भरघाव दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या कारवर आदळली. या घटनेत २५ वर्षीय दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना १८ मार्च रोजी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली. जखमी तरुणाचे नाव अजय संजय अमृते (२५, रा. उमरीजहागीर, ता. हदगाव, जि. नांदेड) असे आहे.

अजय सोमवार, १८ मार्च रोजी रूम पार्टनरची स्पोर्ट बाइक (एमएच १२ – क्यूजे २८२०) घेऊन जेवणासाठी बाहेर पडला होता. दरम्यान, रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती सोसायटीच्या समोर उभ्या कारवर (एमएच १२ – ईटी ६८८२) आदळली. यात अजयच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला खाजगी रिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांनी त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. अजयची प्रकृती चिंताजनक असून, सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस अंमलदार एकनाथ गिरी यांनी दिली.

अपघात रोखणारा गतिरोधकामुळे अपघात !

गतिरोधकामुळे अपघात बजाजनगरात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने शिवाय पांढरे पट्टे नसलेले गतिरोधक आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्याऐवजी त्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे एमआयडीसीने तत्काळ यावर पांढरे पट्टे मारावेत अशी मागणी नागरिक करत आहे.

—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!