July 23, 2024
Home » वडगाव कोल्हाटी येथून बनावट नोटा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे ५०० रू बनावट नोटा छपणाऱ्या तिघांवर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमाई चौक, वडगाव कोल्हाटी येथे बनवत ५०० रू. च्या नोटा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यावरून पोलीस उपनिरीक्षक पथरकर यांच्या टीमने छापा टाकून राजू गवई यांच्या घरामध्ये झाडाझडती घेतली असता एका पेपरवर ४ अशा ५०० रू. च्या नोटा बसवलेले ५५ पेपर तसेच हुबेहूब ५०० रू बनावटी चलन एका बाजून छपाई केलेले ४५४ पेपर जप्त करण्यात आले. याप्रप्रकरणी दि १३ मार्च रोजी सकाळी ४ वा. राजू उत्तम गवई, सुभाष भावराव घुले, रामराव अशोक बोराळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आहे पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!