July 18, 2024
Home » भावनिक मेसेज करत मराठा आरक्षणासाठी अजून एका युवकाची आत्महत्या; सरकार अजून किती बळी घेणार ? मराठा समाजाचा सवाल …

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : आई – वडील, भावाची आठवण काढत मराठा आरक्षणासाठी एक जीव माझा पण असा व्हॉट्सअप मेसेज करत छत्रपती नगर, बजाजनगर मधील एका २० वर्षीय युवकाने गोदावरी नदीमध्ये आत्महत्या केल्याची घटना दि १२ रोजी रात्री घडली.

ओम मोहन मोरे वय २० वर्षे असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई वडिलांसोबत वाळूज महानगरातील छत्रपती नगर बजाजनगर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे राहत होताओम हा एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो नेहमी प्रमाणे . दि १२ मार्च रोजी सायंकाळी ओम घरी न आल्याने आईवडिलांनी कंपनी मलकांना विचापुस केली असता,ओमने व्हॉट्सअपवर ‘मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे एक जीव समाजासाठी’ असा मेसेज केला असल्याचे कळाले याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आईच्या जबाबानुसार नोंद करण्यात आली होती, या प्रकरणी तपास पोलीस आमलदार राजेंद्र उदे हे करीत होते, सायंकाळी ओमकडे असलेली गाडी ही गंगापूर येथील कायगाव गोदावरी नदीच्या काठीशी नागरिकाच्या लक्षात आले. गोदावरी नदीपत्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला असून नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ससाणे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!