July 20, 2024
Home » कंपनीतून तब्बल ३० लाखांचे साहित्य चोरी, चोरटे कॅमेरात कैद …

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील प्लाट नंबर एक्स २८० मधील ओसवाल कॉम्प्लेक्स मधील राजदेव इंडस्ट्रियल कटिंग टूल्स ट्रेडिंग कंपनीमधून चोरट्यांनी तब्बल ३० लाख १६ हजार ५१५ रू. चे टूल्स चोरी केले असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. याप्रकरणी अमित कोरडे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ७ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास याच कंपनीमध्ये बिलिंगचे काम बघणारे योगेश कुलकर्णी यांना शटर उचकटलेले असल्याची कोरडे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ कंपनीत जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये कार्बाइड टूल्स, कार्बाइड एंड मिल, ड्रिल, गन, सेंट्रल टूल, इन्सर्ट, हैंड टूल्स इतर कंपनीमधून मागवलेले टूल असे ४७४ प्रकारचे टूल्स एकूण ३० लाख १६ हजार ५१५ रू किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे

___

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!