July 26, 2024
Home » आठ दिवसांपासून घंटा गाडी न आल्याने महिला संतप्त, रत्यावर कचरा टाकू नागरिकांचा इशारा

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर: बजाजजगरमध्ये मागील आठ दिवसांपासून कचरा संकलनाचे काम बंद केल्याने, मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा रस्त्यावर फेकण्यासाठी महिला एकत्र झाल्या होत्या. सदरील माहिती मिळताच कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाहनासह धाव घेत कचरा संकलन केला. वाळूज औद्योगीक आणि रहिवासी परिसरातील कचरा संकलनाची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाकडे आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून कचरा संकलनाचा ठेका महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीला देण्यात आलेली आहे. प्रत्येक सोसायटीत जावून कचरा संकलन करण्यासाठी स्वतंत्र वाहन आणि कर्मचारी आहेत. त्यासोबतच सार्वजनीक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला, सोसायटी, वसाहक आणि कॉलनी बाहेर पडलेला कचरा संकलन करण्यासाठी स्वतंत्र वाहन व कर्मचारी तैनात असतात. एमआयडीसीकडून यासंदर्भात उत्कृष्ट नियोजन करून देण्यात आले आहे. परंतू मागील काही महिन्यांपासून कचरा संकलनाचे पुरते नियोजन बिघडले आहे. परिणामी नाईलाजाने घरातून निघणारा कचरा उघड्यावर टाकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

दिवाळी न दिल्याने टाळाटाळ करतात

मागील वेळी ‘दिवाळी’ मागण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना घंटागाडी तुम्ही वेळेवर घेवून येत नाहीत. असे कारण सांगत काही महिलांनी दिवाळी देण्यासाठी असमर्थता दाखविली तर काहिंनी प्रतिवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा दिली. परंतू दिवाळी न देणाऱ्यांचा राग मनात धरून संबंधीत तिन्ही सोसायटीकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करण्यास सुरूवात केली.

कर्मचारी अनेकदा अरेरावीच्या भाषेत बोलतात. वेळेत न येणे किंवा आल्यावर हॉर्न न वाजवता तसेच पुढच्या सोसायटीकडे निघून जाणे याबाबत त्यांच्याकडे चौकशी करताच महिलांना अपमानास्पद शब्दांत कर्मचारी खडेबोल सुनावले अशी खंत दुर्गा निंबुळकर, सरला भारती, सीमा जगताप, सुनिता पाटील आदी रहिवाशी महिलांनी व्यक्त केली. यापुढे घंटा गाडी न आल्यास रत्यावर कचरा फेकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!