July 20, 2024
Home » अवकळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; भोकरदन, जाफराबाद भागात वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस …

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-

जालना : जिल्हामध्ये भोकरदन, जाफराबादमध्ये झालेला वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दि २६ रोजी झालेला अचानक पावसाने शेतामध्ये गारांचा सडा टाकलेला दिसत आहे. पारध येथील शेतकरी रमेश आनंद भारती, प्रदीप सतीश भारती, योगेश भारती यांच्या शेतामध्ये हरबरा, गहू, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाची मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!