July 18, 2024
Home » गरुडझेप अकॅडमीच्या सोनवणे बंधूंवर पुन्हा एक गंभीर गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-

छत्रपती संभाजीनगर: पोलीस भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या गरुडझेप अकॅडमीच्या दोन्ही संचालकांवर पुन्हा एक गुन्हा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दि २२ सायंकाळी दाखल झाला आहे. लीना पाटील या तरुणीने अकॅडमीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती, प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी अकॅडमीवर छापा टाकून काही फाइल जप्त केल्या आहे. तसेच याच अकॅडमीमध्ये दि २८ डिसेंबर रोजी श्रीकांत दशरथ वाघ रा आडगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर अकॅडमीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यामुळे आज रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मयत श्रीकांत यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गरुडझेप अकॅडमीचे संचालक सुरेश सोनवणे, निलेश सोनवणे, विजय राठोड, शुभम घुगे या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सगळे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!