July 18, 2024
Home » तरुणीस शारीरिक, मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गरुडझेपच्या दोन्ही संचलकांवर गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर – पोलीस बनण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या १९ वर्षीय तरुणीने छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज महानगर भागात असलेल्या गरुडझेप अकॅडमीमध्ये आत्महत्या केल्याची घटना दि २० रोजी सकाळी उघडकीस आली, या प्रकरणी अकॅडमीच्या दोन्ही संचालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लीना श्रीराम पाटील वय १९ ( रा सावखेडा बु ता पाचोरा जि जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. लीना हिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लीना ने जून २०२२ मध्ये गरुडझेप अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता व एक लाख २० हजार फिस भरुन मेसचे ४ हजार ५०० प्रतिमहा नियमीत भरले जायचे परंतु मेस चे पैसे देण्यास उशीर झाल्यास अकॅडमीकडून नाश्ता मिळायचा नाही. तसेच २०२४ मध्ये लीना मूळ गावी गेली असता वडिलांना गरुडझेप अकॅडमी बद्दल शारीरिक त्रास व मानसिक अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची माहिती आई वडिलांना दिली होती. दि १८ रोजी लिनाने आपल्या वडिलाना फोन करुन कुटुंबाची माहिती विचारपूस केली.त्यानानंतर दि २० रोजी लीनाने गरुडझेप अकॅडमीमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली याप्रकरणी शारीरिक त्रास व अपमानास्पद वागणुकीमुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गरुड झेप अकॅडमीचे संचालक सुरेश सोनवणे निलेश सोनवणे, शुभम गोंगे, मॅनेजर राठोड यांचासह एका महिलेवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहे.

—————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!