July 19, 2024
Home » उद्या वाळूज महानगरात राम भक्ताकडून ३० हजार बुंदीचे पॅकेट्स वाटप …

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे. सगळीकडचे वातावरण राममय झाले असून घरोघरी, मंदिरात जोरदार तयारी सुरु असून वाळूज महानगरातील रामभक्त मयुर चोरडिया व किशोर पाटील यांच्याकडून तीन टन बुंदीमध्ये ३० हजार बुंदीचे पॅकेट्स प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. रामाच्या स्वागतासाठी संपूर्ण देशभरात जय्यत तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी कलश यात्रा, स्वागत यात्रा काढल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणात रामभक्त उपक्रमात सहभागी होऊन उत्सव साजरा करत आहे. यासोबत महिलांनी सुद्धा आपला आनंद फेर धरून व्यक्त करताना दिसून येत आहेत. प्रत्येक मंदिरात स्वच्छता करून भगवा ध्वज लावले जात आहेत. मुख्य म्हणजे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने काही प्रसादाचे देखील आयोजन केले आहे. अशाच प्रकारे वाळूज महानगरात रामभक्ताने बुंदीचा प्रसाद वाटप करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!