July 19, 2024
Home » घराला आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक; ए एस क्लब जवळील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगरातील एएस क्लब जवळील गट नंबर १०५ मधील स्नेह वाटिका सोसायटी जवळील नमन विहार फ्लॅट नंबर २ मध्ये घराला आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना आज दि १४ रोजी सकाळी १० वा. घडली.

सुदाम भोपळे हे कुटुंबासह तिसगाव परिसरातील असलेल्या नमन विहार सोसायटीमध्ये राहतात भोपळे हे कमानिमित्त बाहेर गेले होते, घरी पत्नी व दोन मुले असतांना, सकाळी १० वाजेच्या दरम्यान अचानक बेडरूम मधून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आग लागल्याचे लक्षात येताच शेजारी राहत असलेले रवींद्र पवार अंकुश लेंडाळे, अरुण मडे, दिलीप खंबाट, किशोर पोटे यांच्यासह नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले, पुंडलिक डाके, पोअ. विजय पाटील, लखन दुशिंगे, बबलू थोरात, संजय पवार,मंगेश मनोरे, शासकीय रुग्णवाहिका चालक मंगल राठोड, डॉक्टर अभिजित इप्पर यांनी घटनस्थळी धाव घेतली. ही माहिती अग्निशमन विभागला कळताच छत्रपती संभाजीनगर येथील व वाळूज एमआयडीसी येथील अशा दोन अग्निशमन गाडी दाखल होऊन आग विझवण्यात आली. या आगेचे कारण अद्याप स्पष्ट नसून आगीमध्ये फर्निचर, कपडे, इलेक्टॉनिक साहित्यासह इतर साहित्य जाळून खाक होऊन लाखोंचे नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!