July 18, 2024
Home » धक्कादायक घटना : रांजणगाव बणकरवाडी तलावात ४ अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगरातील रांजणगाव शेणपुंजी येथील बणकरवाडी तलावात ४ अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दि ११ रोजी घडली. घटनास्थळी पोलीस उपायुक्त बगाटे, सहायक पोलीस आयुक्त देशमुख यांचासह तहसीलदार सोनी यांनी भेट दिली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही मृतदेह बाहेर काढून घाटी दवाखान्यात पाठवले आहे.

बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार वय १२, अफरोज जावेद शेख वय१२, जावेद शेख वय १४, अबरार जावेद शेख वय१२ व अजून कुणाल अनिल दळवी वय १२ सर्व रा . दत्तनगर रांजणगाव शेणपूजी, आशा चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी वाळुज एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!