July 18, 2024
Home » वाळूज उद्योगनगरीतील हँडलोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; ६ कामगार गुदमरून मृत्यू तर ४ कामगारांनी वाचवला स्वतःचा जीव …

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला आज लागून ६ कामगारांची मृत्यू झाला असून ४ कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला. ही घटना दि ३० डिसेंबर रोजी रात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राईज सी २१६ या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये सदरण २० ते २५ कामगार काम करतात. १० कामगार कामगार कंपनीमध्ये राहतात. सगळे झोपेत असतांना अचानक काही झोपलेल्या कामगारांना गरम अहाल लागल्याने जाग आली. नेमकी बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने बाहेर येणे शक्य नवते परंतु काही कामगारांनी पत्रे उचकटून एका झाडाच्या सहायाने बाहेर आले.

एका कामगाराने दिलेल्या माहितीनुसार अकबर अली लटकून शेख, अफरोज शेख दिलीप कुमार वय सदरण १८ – २२ सर्व राहणार मिर्झापूर बिहार या कामगारांना जीव वाचवता आला परंतु मध्ये अडकलेले ६ जण भल्ला शेख ६५ , कौसर शेख, इक्बाल शेख मगरुफ शेख व अजून दोन जण वय १८-२२ रा मिर्झापूर या सर्वांचा गुदमरुन मृत्यू झाला. एका कृत्याचा त्यात समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच ६ ते ८ अग्निशमन बंब, ४ रुग्णवाहिका व सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांचासह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व आगिशन दलाचे जवान दाखल झाले व तब्बल ४ तासानंतर आग विझवण्यात अली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!