July 23, 2024
Home » गरुड झेपच्या विद्यार्थ्यांची अकॅडमीमधेच आत्महत्या…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर – होस्टेलवर राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाने बाथरूम मध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. बजाजनगर येथील गरुड झेप कॅरीअर अकॅडमी येथे घडलेली ही घटना गुरुवारी दि २८ रोजी रात्रीसाडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील गरुड झेप करिअर अकॅडमी येथे श्रीकांत दशरथ वाघ ( १८) रा. निपाणी आडगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा पोलीस भरतीची तयारी करत होता. तो येथे येऊन केवळ 11 महिन्याचा कालावधी लोटला होता. तो हॉस्टेल मधील सहा नंबर रूम मध्ये राहत होता. गुरुवारी (दि २८ रोजी श्रीकांत याने हॉस्टेलमधील बाथरूम मध्ये जाऊन लोखंडी अँगलला कमरेच्या बेल्टने गळफास घेतला. बराच वेळ होऊनही तो बाहेर येत नसल्याने दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सहकार्य मित्रांनी दरवाजा तोडून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. होस्टेल मधील शिक्षक आलमखा पठाण आणि संभाजी काळे यांनी त्याला प्रथम बजाजनगर येथील ममता हॉस्पिटल व नंतर घाटी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सकाळी त्याने रूम मधील मुलांना पैसे मागितले होते. असे सांगितल्या जाते. मात्र श्रीकांत वाघ याने आत्महत्या का केली याचे गुपित कळू शकले नाही.दरम्यान वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल निरवळ व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!