July 26, 2024
Home » घरासमोरील धोकादायक पाण्याच्या खड्यामुळे साई नगरमधील नागरीक त्रस्त ; सिडकोकडे कारवाईची मागणी …

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर – बजाजनगरमध्ये मागील आठवड्यामध्ये पाण्याच्या खड्यातपाडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता, असाच एक खड्डा सिडको वाळूज महानगरातील साई नगरमधील ए सेक्टरमध्ये आहे. सहा वर्षापासून काम बंद पडलेल्या एका खाजगी प्लॉट प्लॉटधारकाने बांधकामासाठी हा खड्डा केला असल्याची माहिती नागरिकांनी दिली. परंतु तो उघडा व त्यात पाणी आहे. तेथे परिसरातील लहान मुले तेथे खेळतात. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नागरिकांनी वारंवार प्लॉट मालकाला सांगूनही खड्डा बुजवल्याजात नसल्याने नागरिकांनी सिडकोकडे कारवाईची मागणी केली आहे.सिडको अधिकाऱ्यांनी या खड्याची पाहणी करून खड्डा बंद करण्याची प्लॉट मालकाला सांगूनही अद्याप खड्डा न बुजवल्याने नागरिक आक्रमक झाले आहे. यावेळी मंगेश वाघ वाघ , दीपक दाभाडे, गोकुळ आव्हाड, मचिंद्र गोल्हार, सुरेखा दाभाडे, हिराबाई निघुत, अंजली आव्हाड, रुपाली गुल्हार, पूजा वाते
आरती काळे यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!