July 23, 2024
Home » बसने दोघांना चिरडले, एक ठार, एक जखमी


न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : चौकात उभ्या असलेल्या दोघांना भरधाव जाणाऱ्या बसने जोराची धडक देऊन चिरडल्याने एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील दहेगाव बंगला येथे शनिवारी दि २३ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लासुर स्टेशन येथील अजय गुलाबराव महाले वय 40 वर्ष व प्रल्हाद हिरालाल कुमावत वय 50 हे दहेगाव बंगला येथील पेट्रोल पंपवरून बिगारी काम करून येत असताना दहेगाव बंगला चौकात थांबलले होते. संभाजीनगरवरून गंगापूरकडे जाणारी एसटी महामंडळाच्या बस (एम एच 20, बी एल-2793)ने दोघांना चिरडले. शनिवारी दि २३ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोघेही जखमी झाले. त्यातील कुमावत यांची प्रकृती चिंताजनक असल्याने दक्षता अधिकारी संदीप पाटील यांचा कॉल होताच लिंबे जळगाव पॉईंट वर उभी असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांची विनामूल्य ॲम्बुलन्स 24 तास सेवेत असणारी रुग्णवाहिका चालक संदीप त्रिंबके यांनी त्वरित अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना जिल्हा रुग्णालय,(घाटी) येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून कुमावत यांना मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!