July 23, 2024
Home » दोन चिमुकल्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघांवर गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : बजाजनगरातील इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये एका इमारतीचे काम सुरु होते त्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्यामध्ये सांडपाणी साठलेले होते त्या पाण्यामध्ये दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोघांवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजाजनगर मधील इंद्रप्रस्त कॉलनीमध्ये दि १५ रोजी चैताली राहुल देशमुख वय 10 वर्षे, समर्थ राहुल देशमुख वय 07 वर्षे या दोन चिमुकल्यांचा सांडपाणी साठवून ठेवलेल्या पाण्यात पडून मृत्यू झाला या प्रकरणी चिमुकल्यांच्या आई विद्या राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून अशोक शिंगारे, व नितीन गायकवाड या दोन आरोपींवर रात्री उशिरा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम ३०४ ( अ) ३४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन डाके हे करीत आहे.

—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!